अमृता फडणवीसांना आधी लाच देण्याचा प्रयत्न मग धमक्या? संपूर्ण प्रकरण

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितला घडला संपूर्ण प्रकार

    16-Mar-2023
Total Views |
Amruta fadnavis
Amruta Fadnavis
 
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच धमकीही देण्यात आली. अनिल जयसिंघानी नावाचा फरार व्यक्ती जो सात ते आठ वर्षे फरार असून त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. जयसिंघांनीची उच्चशिक्षित मुलगी २०१५-१६ दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर तिने भेटणे बंद केले होते. २०२१ रोजी पुन्हा एकदा तिने अमृता फडणवीस यांना भेटण्यास सुरुवात केली.
 
आपण स्वतः एक डिझायनर असल्याचे सांगत स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती तिने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना दिली. काही काळानंतर आपल्या आईवर श्रद्धांजलीपर एक पुस्तक प्रकाशन केले होते. त्याचे प्रकाशन अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी करवून घेतले. अशाप्रकारे विश्वास संपादित केला. त्यानंतर डिझायनर कपडे वापरण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे आग्रह केला होता. कालांतराने जयसिंघानींच्या मुलीने आपल्या वडिलांबद्दल अमृता यांना माहिती दिली. माझ्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यांमध्ये अडकविले आहे. त्यांना कृपया सोडवावे, अशी विनंती केली. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या संदर्भातील जे काही निवेदन आहे ते सादर करण्यास सांगितले.
 
सरकार बदलेपर्यंत तिने कुठल्याही प्रकारे वडिलांचा उल्लेख केला नव्हता. मात्र, सत्ताबदलानंतर तिने पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. "ती म्हणाले की माझ्या वडिलांच्या ओळखीत काही बुकी आहेत. मागच्या काळात आम्ही बुकीची माहिती रेड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना देत होतो. त्यानंतर रेड पडल्यावर आम्हाला दोन्ही बाजूने पैसे मिळायचे. आपणही अशाच प्रकारे रेड कन्डक्ट करू, अशी ऑफर अमृता फडणवीस यांना देण्यात आली होती. हा प्रकार घडल्यावर अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis)  यांनी अशा गोष्टींना थेट नकार दिला आणि अशा कुठल्याही गोष्टींच्या व्यवहारांचा उल्लेख आपल्याशी करू नये, असा दम भरला.
 
त्यानंतरही पुन्हा सिघानियांच्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, तिचा बोलण्याचा रोख बदलला. "आपण बुकीजवर रेड टाकूयात," अशी गळ वारंवार ती महिला घालत होती. तसेच आपल्या वडिलांना सोडविण्यासाठी वारंवार अमृता फडणवीस यांच्याकडे ही विनंती करत होती. वारंवार असे प्रकार सुरू असल्याने अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) तिला ब्लॉक केले. दोन दिवसानंतर अमृता फडणवीस यांना दुसऱ्या एका मोबाईलवरून व्हीडिओ क्लिप्स पाठविण्यता आल्या. त्यातील काही अमृता फडणवीस आणि त्या महिलेचे संभाषण रेकॉर्ड केलेले होते. त्यात एक गंभीर दखल घेण्यासारखा व्हीडिओ दाखविला.
 
ज्यात सिंघानियांची मुलगी एका बॅगेत वस्तू भरत असतानाचा व्हीडिओ दाखवला. फडणवीसांच्या घरी काम करत असणाऱ्या एका महिलेकडे बॅग पोहोचवत असल्याचा हा व्हीडिओ होता. हे व्हीडिओ आम्ही जर का सोशल मीडियावर टाकले तर तुमचे पती अडचणीत येतील. माझे सर्वपक्षांशी संबंध आहेत. आम्हाला तत्काळ मदत करा, आमच्या सर्व केसेस घ्या, सिंघानियाला निर्दोष मुक्त करा अन्यथा आम्ही हे व्हीडिओ व्हायरल करू, अशा धमक्या देण्यात आल्या. अमृता फडणवीसांनी घडला प्रकार देवेंद्र फडणवीसांना सांगितला.
 
त्यानंतर पोलीसांनी पाचारण करण्यात आले. त्यानंतर एफआयआर दाखल केला. मात्र, हा एफआयआर सार्वजिनक केला नाही. त्यानंतर पोलीसांनीही ट्रॅप लावत गुन्हेगारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सिंघानियाच्या माणसांनी यात पोलीसांची नावे, नेत्यांची नावेही घेतली. सिंघानियांच्या मुलीने या संभाषणात मागील सरकारच्या काळात तिच्या वडिलांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रीया मुंबई पोलीस आयुक्तांनी सुरू केल्याची माहिती दिली. तिने काही नावेही घेतली. जर आत्ता आमच्या केसेस मागे घेतल्या तर आम्ही सर्व खुलासा करण्यासाठी तयार आहोत, असेही सांगितले.
 
एफआयआर (FIR) दाखल झाल्यानंतर ही माहिती पोहोचत गेली. एका वृत्तपत्राच्या हाती हा एफआयआर लागला. त्यानंतर तो प्रकाशित झाला आणि आरोपी सतर्क झाले. सिंघानियाची मुलगी हाती लागेल की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. मात्र, आरोपी अद्याप फरारी आहे. पोलीस अधिक तपास सुरू आहे. त्या व्यक्तीचा सुगावा लागल्यानंतर बऱ्याच गोष्टी हाती लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis)  यांच्याशी दीड वर्षे सिंघानियाच्या मुलीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सतत कुठल्यातरी एका नातेवाईकला सोबत घेऊन येत असे आणि अमृता फडणवीस यांच्याशी होणारे संभाषण रेकॉर्ड करत असे. एका व्हीडिओत डॉलर दाखवत असून ती आता डॉलर आपण त्यांना देणार असल्याचे सांगत आहे. डॉलर दिल्याचा कुठेही व्हीडिओ नाही मात्र, आरोप करण्यासाठी हे फूटेज त्या महिलेने रेकॉर्ड केले आहे. हे सर्व फूटेज फॉरेन्सिक चौकशीसाठी पाठविण्यात आले. तसेच हा संपूर्णपणे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याची नोंद पोलीसांनी केली आहे. ही संपूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर विधानसभेत दिली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.