देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत धक्कादायक खुलासे

16 Mar 2023 17:34:57
Devendra Fadnavis


मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला हेाता.
 
अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याच्या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अडचणीत आणण्यासाठीच हा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती असून, तो सात आठ वर्षांपासून फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. त्याची एक मुलगी २०१५-१६ दरम्यान अमृता यांना भेटत होती. नंतर अचानक भेटणं बंद झालं. २०२१ मध्ये पुन्हा तिने भेटणं चालू केले.

त्यावेळी ती, मी डिझायनर आहे. ज्वेलरी तयारी करते आणि मी बेस्ट पॉवरफुल वुमेन्समध्ये माझे नाव आले आहे. त्यानंतर माझी आई वारली आहे. मी तिच्यावर पुस्तक लिहलं आहे. तुम्ही त्याचे प्रकाशन करा. असे सांगत तिने विश्वास संपादन केला. त्यानंतर येण जाण सुरु केले. त्यातुन तिने अधिक जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आले आहे आणि तुम्ही त्यांना सोडवा. असे सांगितले. त्यावेळी माझ्या पत्नीने तिला सांगितले तुझ जे काही निवेदन आहे ते फडणवीसांना देऊन टाक. त्या मुलीने माझ्या वडिलांना फसवण्यात आले आहे. तुम्ही मदत करा. असे सांगत माझे वडिल सगळ्या बुकिजना ओळखतात असेही सांगितले.
 
मागील काळात आम्ही काही बुकिजची माहिती देत होतो आणि मग तिथे रेड होत होती. त्यावेळी आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळत. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करु, अशी ऑफरही तिने दिली.असल्या फालतू गोष्टी आम्ही करत नाही. अस उत्तर अमृता यांनी तिला दिले. त्यानंतर एक दिवस पुन्हा तिने सांगितलं. अशा प्रकारे काम केलं तर आपल्याला फायदा होईल. मला मदत करा नाहीतर मी तुम्हाला १ कोटी रुपये देते तुम्ही माझ्या वडिलांना सोडवा.वारंवार याच गोष्टीचा तगादा लावण्यात आल्याने माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केले. त्यानंतर अज्ञात क्रमांकावरुन व्हिडीओ, ऑडिओ, मेसेज येऊ लागले. यात अत्यंत गंभीर व्हिडीओ दिसला. त्यामध्ये ती बॅगेत पैसे भरते आणि ती बॅग आमच्या घरी काम करणार्‍या बाईला देते आणि त्यासोबत धमकी देखील दिली.
 
हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवर्‍याची बदनामी जाईल. माझे सर्व पक्षाशी संबंध आहे. तुम्ही ताक्ताळ आम्हाला मदत करा. हे माझ्या पत्नीने मला सांगितलं. मी लगेच पोलिसांना बोलावले.पोलिसांनी फॉरेनेसिंक रिपोर्ट करण्यात आला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. त्यात काही पोलिसांसह राजकीय नेत्यांची नाव घेतली.मागच्या सिपींच्या काळात आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरु होती. तुम्ही आल्यावर थांबली. आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस नाही केल्यातर आम्ही उलटं सांगायला सुरुवात करु. यातील काही गोष्टी रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत.पोलिसांकडे सर्व गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत. आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्या मुलीने ज्या प्रकारच्या हिंट देण्यात आल्या आहेत. त्यातून असं लक्षात येत की मला आणि माझ्या कुटूंबाला अडकवण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 
 
Powered By Sangraha 9.0