कपिल देव यांच्यासाठी मोठी घोषणा!

    16-Mar-2023
Total Views |
 
कपिल देव यांची क्यूएमएम एमएएसच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी निवड

मुंबई, १६ मार्च २०२३: क्यूएमएस एमएएस (मेडिकल अलाईड सर्विसेस) या हेल्थकेअर व वेलनेसच्या क्षेत्रातील अग्रणी कंपनीने क्रिकेटर, अभिनेते व परोपकारी कपिल देव यांची त्यांचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

हा सहयोग अधिक पुढे घेऊन जात व्यासपीठाने त्यांचे मेडिकल डायग्नोस्टिक डिवाईसेस क्यू-डिवाईसेसच्या लॉन्चसाठी दिग्गज क्रिकेटर असलेली त्यांची नवीन जाहिरात क्यू डिवाईसेस: यू कॅन काऊंट ऑन देम देखील लॉन्च केली आहे. २८ वर्षांहून अधिक काळाचा वारसा पुढे घेऊन जात ब्रॅण्ड क्षेत्रातील सर्वात विश्वसनीय, विश्वासार्ह व आदरणीय कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे, जे त्यांच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर निवडीमधून देखील दिसून आले आहे. कंपनी ग्राहकांकरिता हेल्थकेअरला चालना देण्यासाठी सानुकूल वैज्ञानिक सोल्यूशन्स देते. त्यांची उत्पादने पूर्णत: मेड इन इंडिया आहेत आणि सहकारी नागरिकांना प्रतिष्ठित, आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यास मदत करण्याचे ध्येय आहे.

क्यूएमएस एमएएसच्या सह-संस्थापक डॉ. गुड्डी मखिजा म्हणाल्या, ‘‘कंपनी म्हणून आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्राहकांच्या स्वास्थ्याला अधिक प्राधान्य देतो. विश्वसनीयता, सेवा, दर्जात्मक हमी व नवोन्मेष्कार ही क्यूएमएस एमएएसची मुलभूत मूल्ये आहेत आणि कपिल देव हे या मूल्यांचे मूर्त स्वरूप आहेत. ज्यामुळे ते आमची पहिली निवड होते. आम्हाला आमच्या ग्राहकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे आणि त्यांचे आरोग्य व स्वास्थ्याला अधिक महत्त्व देतो. म्हणून आम्हाला सर्वांशी जुडली जाऊ शकेल अशी आदर्श व्यक्ती सोबत असण्याची गरज होती. आमचा विश्वास आहे की, कपिल देव यांचा प्रेमळपणा व आत्मविश्वासामुळे ग्राहक त्यांच्याशी जुडले जातील. ब्रॅण्ड म्हणून आमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आाहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणण्याचे आमचे ध्येय संपादित करण्यामध्ये ते आम्हाला साह्य करतील.’’

कपिल देव म्हणाले, ‘‘देशातील सध्याच्या स्थितीमुळे पुन्हा एकदा आरोग्यसेवा विभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जीवनशैलीसंबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे आणि भारत जगातील मधुमेहाची राजधानी बनण्याच्या टप्प्यावर आहे. आपण आपल्या आरोग्याची बारकाईने देखरेख करण्याची गरज आहे आणि क्यूएमएस एमएएस ही बाब सक्षम करण्यासाठी सुलभपणे सर्वात प्रगत हेल्थकेअर उपकरण उपलब्ध करून देते. कंपनी ग्राहकांच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आणि त्यांचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणे हा सन्मान आहे. मी दीर्घकालीन व लाभदायी सहयोगासाठी उत्सुक आहे.’’
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.