जेव्हा गुनीत मोंगाकडे ऑस्करला जाण्यासाठी पैसे नव्हते..
15-Mar-2023
Total Views |
यावर्षी नाटु नाटु गाण्यासोबत द एलिफंट व्हिस्परर्स या लघुपटाला ऑस्कर मिळाला आहे. त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना द एलिफंट व्हिस्परर्स लघुपटाची निर्माती गुनीत मोंगा हिने आपल्या ऑस्कर बद्दलच्या आठवणी सांगितल्या. गुनीत म्हणतात, "२०१० मध्ये मी एक 'कवी' नावाचा लघूपट केला होता. त्यावेळीही मला ऑस्कर साठी नामांकन मिळाले होते. परंतु तो सोहळा पाहण्यासाठी अमेरिकेला जाण्याइतके पैसेच माझ्याजवळ नव्हते. मी अनेकांना याविषयी पत्रे लिहिली. त्यावेळी प्रतिभा ताई पाटील या राष्ट्रपती होत्या. त्यांनी माझ्या पत्राला उत्तर दिले. त्यांना माझी अगतिकता सांगितल्यानंतर तत्कालीन मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्या प्रश्नांची दखल घेतली. ज्या देशाला ऑस्कर साठी नामांकन मिळवून देते त्या सोहळ्याला प्रतिनिधी म्हणून मला जात येऊ नये ही खेदाची गोष्ट आहे. मला मदत मिळाली आणि मी सोहळ्यासाठी गेलेसुद्धा. परंतु मला ऑस्कर मिळाला नाही. आणि आज तो सुदिन उगवला."