सीआयडीच्या निर्मात्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

    15-Mar-2023
Total Views | 148

cid 
 
मुंबई : सीआयडी मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पर यांचे सिंगापूर येथे निधन झाले आहे. त्यांचे निधन हे कर्करोगानं झाले असून त्यावर ते बराच काळ उपचारही घेत होते. अनेक मुलाखतींतून शिवाजी साटम यांनी आपल्यासोबतच्या प्रदीप उप्पर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. काल त्यांनी शेअर केलेल्या इन्टाग्राम पोस्टवरून ही माहिती त्यांनी जाहीर केली. सीआयडीसोबतच 'आहट', 'सतरंगी सुसराल', 'सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स' अशा काही लोकप्रिय मालिकांचीही निर्मिती केली होती. त्यांचा 'नेल पॉलिश' हा सिनेमा शेवटची निर्मिती असणारा ठरला.
 
आपल्या लहानपणापासून सुरू असलेल्या मालिका या आपल्या आठवणींत आजही आहेत त्यातीलच एक होती ती म्हणजे सीआयडी. ही मालिका आपल्या डोळ्यासमोर आली की 'कुछ तो गडबड हैं दया' हा डायलॉग आठवत असेलच. एसीपी प्रद्युम्न यांच्या तोंडातून बाहेर पडणारं हे वाक्य आपल्याला पाठही झालं असेलच. या मालिकेतली हरएक पात्र हे प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहणार आहे. परंतु ही जादू आपल्यापर्यंत पोहचवण्याचा विडा ज्यांनी उचलला त्या निर्मात्यांचे नुकतेच निधन झाले आहे.
 
त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कलाकारांसोबतच चाहत्यांनाही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121