महिलांवर वैवाहिक आणि कौटुंबिक कारणांमुळेच सर्वाधिक अत्याचार

केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय-कायदेविषयक प्रकरणांच्या अभ्यासाचा अहवालातून उघड

    15-Mar-2023
Total Views |
Women Domestic Violence


मुंबई : कौटुंबिक हिंसाचारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती केईएम रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून उघडकीस आली आहे. तसेच या अभ्यासातून कौंटुबिक कारणांमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे. लिंग-आधारित हिंसाचारामुळे मरण पावलेल्या महिला आणि मुलींचे प्रमाण शोधणे आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे मूल्यांकन केले असता अभ्यासात, नागरी संचालित केईएम हॉस्पिटल-परळच्या फॉरेन्सिक विभागाला महिलांचे अनैसर्गिक मृत्यू "अपघाती मृत्यू" म्हणून नोंदवल्याचे आढळले. जातात.

 
रुग्णालयामध्ये आसपासच्या परिसरातून आलेल्या आणि संदर्भीत केलेला शवविच्छेदन अहवाल
 
१. १,४६७ पैकी ८४० म्हणजे ५७.३ टक्के महिलांचा अनैसर्गिक कारणांमुळे मृत्यू

२. १८१ हिंसाचाराला बळी पडलेल्या ६७ टक्के महिला विवाहित

३. ५३.२९ टक्के महिला अविवाहित

४. ७.४ टक्के महिला घटस्फोटित तसेच पतीपासून विभक्त झालेल्या
 
५. यापैकी ५८ महिलांचा मृत्यू जळल्यामुळे

६. २० टक्के महिलाचा गळफास

७. १६ टक्के महिलांनी विष घेऊन आत्महत्या

८. ३ टक्के महिला उंचीवरून पडल्यामुळे मृत्यू


९. सहा टक्के महिलांना गंभीर मारहाण

१०. ३८ टक्के मृत्युंमध्ये औषधे, केमिकल्सचा वापर
 
११. धूर, आग यामुळे ३५ टक्के मृत्यू

१२ २४ टक्के मृत्यू शस्त्राचा वापर न करता झालेल्या हल्ल्यामुळे


- वैवाहिक आयुष्याशी निगडित समस्यांमुळे महिलांचे मृत्यू - ६६.५८ टक्के


- घरगुती भांडणामुळे - ३३.२९ टक्के
 
- नातेसंबधातील ताणतणाव, अयशस्वी प्रेमप्रकरण - १५.१३ टक्के

गळफास, उंचावरून उडी घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी हा एक दिवसापेक्षाही कमी आहे. दरम्यान ११४ पैकी ६९ प्रकरणांमध्ये पती वा जोडीदार हाच त्या महिलेच्या मृत्युसाठी कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. तर ३५ टक्के प्रकरणांमध्ये कुटुंबातील इतर सदस्य देखील कारणीभूत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.