तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

    15-Mar-2023
Total Views |
Strict action will be taken against the culprits for finding unauthorized stock of rice


मुंबई: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य शिरीष चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवलेला ६ लाख ७० हजार १५० रुपये किमतीच्या ७२९ गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी १६ डिसेंबर रोजी दोषींवर कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी आणखी काही लिंक आहे का हे तपासून घेण्यात येत आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.