तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा; व्हायरल व्हिडिओवर राऊतांचा हल्लाबोल!

    15-Mar-2023
Total Views |
 
Sanjay Raut on viral video
 
मुंबई : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. "तो व्हिडीओ मॉर्फ आहे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. आधी ओरिजिनल व्हिडीओ दाखवा. तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी स्पष्ट होऊ द्या," असं राऊत म्हणाले.
 
"तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सुनावतानाच सार्वजनिक ठिकाणी मुका घेणारे सुर्वे हे पहिले गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही?" असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ लाईव्ह केला होता. त्याला अटक का केली नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
 
"मुंबईत व्हिडीओचं प्रकरण सुरू आहे. मुका घ्या मुका नावाचा सिनेमा सुरू आहे. आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा सिनेमा गाजला होता. मुका घ्या मुका. मुका घ्या मुका प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करता? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. तुमच्या मुका प्रकरणात शिवसैनिकांचा संबंध काय? आम्ही सांगितलं का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल." असं संजय राऊत म्हणाले.
 
"मी तो व्हिडीओ पाहिला नाही. पण मला असंख्य कार्यकर्ते फोन करत आहेत. आमच्या घरावर पोलीस आले. आमच्या कार्यालयात पोलीस आले, असं कार्यकर्ते सांगत आहेत. काय प्रकार सुरू आहे? तो व्हिडीओ आमदाराच्या मुलानं शेअर केला. त्याला अटक केली का? नाही ना? मग कुणाची बदनामी करत आहात? तुमच्या पक्षातील अंतर्गत भांडणं असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष्य करू नका." असा इशारा राऊत यांनी दिला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.