शितल म्हात्रे व्हीडिओ प्रकरण : प्रकाश सुर्वेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

    15-Mar-2023
Total Views |
Prakash Surve on Sheetal Mhatre Viral Video


मुंबई
: शिवसेनेच्या पदाधिकारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे राज्यातील वातावरण तापले असून, या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी होत असलेला अपप्रचार अयोग्य असल्याचे म्हणत एक निवेदन प्रसिध्द केले आहे.आक्षेपार्ह व्हिडीओतील शितल म्हात्रे यांनी अनेकदा माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. पण प्रकाश सुर्वे यांच्या मौनामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. तसेच अपप्रचारही केला जात होता.
 
या प्रकरणी अखेर आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी आपली तब्येत ठीक नसल्याने आपण बोललो नाही, असे म्हटले आहे. “मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड रुग्णालयात दाखल होतो. सध्या मला घशाचा संसर्ग झाला असून, सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्ला जात आहे. त्यामुळे मी हे विस्तृत निवेदन देत असल्याचेही सुर्वे यांनी म्हटले आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.