मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी आणला मिरे अॅसेट निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 इटीएफ फंड

15 Mar 2023 17:46:38
 

मुंबई : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड पैकी एक असलेल्या मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने आज मिरे अॅसेट निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 इटीएफ हा नवीन फंड बाजारात आणत असल्याची घोषणा केली. मिरे अॅसेट इटीएफ हा मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाचा   एक भाग आहे आणि मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडद्वारे व्यवस्थापित एक्सचेंज ट्रेडेड फंडांशी संबधित आहे.
 
नवीन फंड ऑफर (एनएफओ) ही 13 मार्च 2023 ला खुली झाली असून गुंतवणूकीसाठी 21 मार्च 2023 ला बंद होणार आहे. त्यानंतर निरंतर खरेदी आणि विक्रीसाठी हा फंड 27 मार्च 2023 ला पुन्हा खुला होत आहे. या फंडाचे व्यवस्थापन मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाच्या श्रीमती एकता गाला या सांभाळणार आहेत. एनएफओदरम्यान, गुंतवणूकदार किमान पाच हजार रुपयांची गुंतवणूक करु शकणार आहे. त्यानंतर ते एक रुपयाच्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकतील.
 
निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 निर्देशांक हा स्मार्ट बीटा ईटीएफशी संबंधित आहे. मोठ्या बाजार भांडवल विभागातील कमी अस्थिर समभागांची कामगिरी मोजणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट बीटा ईटीएफचे उद्दिष्ट सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचे फायदे एकत्रित करणे आहे. स्मार्ट बीटा ईटीएफ जगभरात लोकप्रिय होत आहेत, कारण विविध घटकांचा वापर करून अल्फा स्वरुपाचा परतावा निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता आहे.
 
निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 निर्देशांकाची प्रमुख वैशिष्ट्ये
 
1.     बाजारातील दोलनामय काळात निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 निर्देशांकाने चांगली कामगिरी केल्याचे दिसते
 
2.     अल्पावधीत तो मंदीच्या बाजारात/अस्थिर बाजाराच्या काळात गुंतवणूक म्हणून वापरले जाऊ शकतो.
 
3.     दीर्घ मुदतीत याचा संभाव्य गुंतवणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो, कारण निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 निर्देशांकाने दीर्घ कालावधीत उच्च जोखीमेशी संबंधित समायोजित परतावा निर्माण केलेला आहे.
 
4.     व्यापक बाजार तसेच इतर घटक निर्देशांकांच्या तुलनेत त्यात तुलनेने अल्प घसरण आहे.
 
5.     विविध क्षेत्रात पर्यायी गुंतवणूकीची संधी प्रदान करते आणि  निफ्टी 100 निर्देशांकापेक्षा अतिशय वेगळा आहे.
 
नवीन फंडाबद्दल बोलताना मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लिमिटेडच्या ईटीएफ उत्पादन आणि निधी व्यवस्थापक विभागाचे प्रमुख सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले की, स्मार्ट बीटा धोरणे सामान्यत: पद्धतशीर, नियम-आधारित दृष्टीकोन खर्च प्रभावीपणे वापरून विविध क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी हेरत जातात. प्रदीर्घ कालावधीत निफ्टी 100 लो व्होलॅटिलीटी 30 निर्देशांक जोखीमेशी संबंधित उत्तम परतावा मिळवून देण्याचे उद्दीष्ट ठेवतो आणि विविध क्षेत्रात गुंतवणूकीचे पर्याय मिळवून देतो. आपल्या पोर्टफोलिओतील अस्थिरतेबाबत तसेच बाजार घसरणीच्या जोखीमेबाबत अतिदक्ष असलेल्या तसेच अल्प जोखीम स्वीकारत दीर्घ कालावधीत संपत्ती निर्माण करण्याची आकांशा असलेल्या गुंतवणूकदारासाठी हा फंड अतिशय उपयुक्त आहे. सध्याच्या बाजारातील अनिश्चिततेच्या काळात, कमी अस्थिरता असलेल्या इटीएफचा गुंतवणुकीसाठी विचार केला जाऊ शकतो, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.


WhatsApp Image 2023-03-15 at 15.26.08.jpg
Powered By Sangraha 9.0