लष्कर उपप्रमुख लडाख दौऱ्यावर!

    15-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारत – चीन एलएसीदरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लडाखचा दौरा केला आहे.
 
 
Lt. Gen. Upendra Dwivedi
 
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी बुधवारी सकाळी लडाखला पोहोचले. त्यांनी कामकाजातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच वेळी, त्यांनी भारताच्या सीमा संरक्षण बळकट करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात केलेल्या सैन्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे देखील कौतुक केले. भारतीय लष्कराने गेल्या काही काळापासून लडाखमध्ये आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आता येथे गस्त वाढवली आहे. अलीकडे भारतीय सैन्य गस्तीसाठी घोडे आणि खेचरांचाही वापर सुरू केला आहे. या परिस्थितीचाही लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी आढावा घेतला.
 
लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लडाखमधील लेफ्टनंट जनरल रिग्जिन चोरोल या महिला लष्करी अधिकारी यांचीही भेट घेतली. सर्व अडचणींवर मात करून तिच्या पतीचे स्वप्न साकार केल्याबद्दल त्यांनी रिगिन यांचे कौतुकही केले. रिग्जिन चोरोल यांचे पती रिग्जिन खंडप लडाख स्काउट्सच्या जेदांग सुम्पा बटालियनमध्ये रायफलमन होते. कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात खंडप यांना जीव गमवावा लागला होता. पत्नी रिगिनने सैन्यात अधिकारी व्हावे, असे खंडप यांचे स्वप्न होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.