लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत सापडला महिलेचा मृतदेह

    15-Mar-2023
Total Views |
 
Lalbagh dead body
 
 
मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात मंगळवारी खळबळजनक घटना घडली असून एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये ५३ वर्षीय महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये सापडला आहे. दरम्यान याबाबत काळाचौकी पोलिसांकडून तपस सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
 
ही महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होती. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान काळाचौकी पोलीस स्थानकात नोंदवली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासास सुरवात करण्यात आली असता महिलेचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या सडलेल्या अवस्थेत सापडला.
 
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच महिलेच्या मृत्यूच्या कारणाचा शोध पोलीस घेत असून या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.