मेटाचा १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ

15 Mar 2023 18:10:32
 
Facebook meta
 
 
मुंबई : फेसबुकची मूळ कंपनी मेटाने पुन्हा एकदा सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. 'आपण आपल्या समुहाच्या संख्येत १० हजाराने कपात करणार आहोत. यातील ५ हजार अशी पद आहेत, ज्यासाठी आजवर कोणतीही भरती करण्यात आलेली नाही, ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
 
दरम्यान मेटा आपल्या संस्थेच्या संरचनेत मोठा बदल करत असून कमी प्राधान्याचे प्रकल्प देखील मेटाकडून रद्द करण्यात येत आहेत. मेटामधील १० हजार कर्मचाऱ्यांना काढल्याच्या वृत्तानंतर मेटाने शेअर्सच्या प्री-मार्केट ओपनिंगमध्ये २ टक्क्यांची उसळी मारली आहे.
 
कर्मचाऱ्यांना काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन टेक कंपन्यांवरील गंभीर संकट. मेटाचा जाहिरात महसूल कमी झाला असून यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये मेटाने तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. २००४ मध्ये फेसबुकच्या स्थापनेच्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0