"पावसात सभा झाल्याचा फायदा आपल्यालाचं!"

    15-Mar-2023
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या भुमिकेकडे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी राज्यभरात संयुक्त सभांची घोषणा केली आहे. शिवाय, "पावसात सभा झाल्याचा फायदा आपल्यालाचं होतो." असे म्हणत त्यांनी शरद पवारांची भरपावसात झालेल्या त्या सभेची आठवण करुन दिली.
 
उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह मविआचे महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. नाना पटोले, जयंत पाटील यांनीही बैठकीला हजेरी लावली. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महविकास आघाडीची बैठक सुरु आहे. राज्यभरातील नियोजित सभांबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
मविआच्या सभांची सुरुवात मराठवाड्यातून होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचही ते म्हणालेत. सभेबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड मध्ये झालेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. तशीच गर्दी आता प्रत्येक सभेला व्हायला हवी. सभेला महत्त्वाच्या पक्षाचे केवळ दोन प्रतिनिधी भाषणं करतील. सभेची सुरुवात मराठवाड्याच्या प्रवेशद्वारात छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. त्यासाठी अंबादास दानवे पुढाकार घेतली. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यायचं. ही सभा २ एप्रिल रोजी होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल."
 
"जो सभा मोठी घेईल, त्याला निश्चित बक्षीस मिळणार असंही अजितदादा म्हणाले. तसेच पाऊस असो किंवा नसो, सभा होणार. पावसात सभा झाली की आपल्याला फायदा होतो."