उर्दू ही पाकिस्तानची नाही तर भारतीय भाषा! : जावेद अख्तर

14 Mar 2023 17:44:22

javed 
 
मुंबई : गीतकार जावेद अख्तर व त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी नुकत्याच आपल्या नव्या अल्बमचे उदघाटन केले. उर्दू भाषेतील हा अल्बम म्हणजे 'शायराना सरताज'. यानिमित्त कार्यक्रमात बोलताना जावेद म्हणाले, "उर्दू ही पाकिस्तानी भाषा आहे असे काहींचे मानणे आहे. परंतु तसे नाही. ती हिंदुस्थानीभाषा आहे. भारत पाकिस्तानचे विभाजन उर्दूच्याही नंतर झाले त्यामुळे ती पाकिस्तानी भाषा होऊच शकत नाही."
 
जावेद अख्तर पुढे म्हणाले, भाषा ही कधीच कोणत्या धर्माची नसते. ती त्या त्या प्रदेशाची असते." पाकिस्तान आणि इजिप्त चे उर्दू भाषेत योगदान आहि तर उर्दूच्या बांधणीत पंजाब प्रांताचे भरीव योगदान आहे.
 
पाकिस्तानमुळे ही भाषा आपण सोडली आहे का? हिंदी जर पाकिस्तानने काश्मीर आपलेच म्हटले तर तुम्ही ते मान्य कराल का? त्याचप्रमाणे उर्दू ही देखील भारताची भाषा आहे, ज्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.
 
आजकाल नवीन पिढीचे लोक इंग्रजीवर जास्त लक्ष देतात. तरुण पिढी आणि लोक कमी उर्दू आणि हिंदी बोलतात. आपण हिंदीत बोलले पाहिजे कारण ती आपली राष्ट्रभाषा आहे. भाषा कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसून ती प्रदेशांवर आधारित असल्याचेही जावेद अख्तर म्हणाले. जर भाषा धर्माशी संबंधित असती, तर संपूर्ण युरोपमध्ये एकच भाषा बोलली जात असे. 
 
 
Powered By Sangraha 9.0