उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!

भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

    14-Mar-2023
Total Views |
subhash-desais-son-bhushan-desai-joins-shinde-shivsena

 
मुंबई :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव यांना धक्का बसला आहे.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची सर्व बाजूंनी कोंडी केली. त्यातच निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असून सर्वोच्च न्यायालयातही शिंदे यांच्याच बाजूने निकाल लागणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत वर्षानुवर्ष एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनीदेखील ठाकरेंना रामराम केला. त्यात सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.