ठाकरे गटाला पुण्यातही धक्का

14 Mar 2023 18:48:05
shiv-senas-former-city-chief-shyam-deshpande-joins-bjp


पुणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातून भाजप आणि शिंदे गटाकडे जाणार्‍या पदाधिकार्‍यांचा ओघ सुरूच असून उद्धव ठाकरे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक श्याम देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये मुंबईतील एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. देशपांडे हे २०००-२०१२ या कालावधीत कोथरूड भागातून नगरसेवक होते. तसेच २००८-०९ मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची शक्ती आणखीनच वाढली असल्याचे म्हटले जात आहे.


Powered By Sangraha 9.0