कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदान

14 Mar 2023 15:25:13
shindes-relief-to-farmers-३००-rupees-per-quintal-will-be-given-as-subsidy-for-onion


मुंबई
:उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळाल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍याला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान मिळणार असल्याची घोषणा विमिधमंडळात केली. त्यामुळे गोंधळ घालणारे विरोधक शांत झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांदा उत्पादकांना ३०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करुन मोठा दिलासा दिला आहे.


Powered By Sangraha 9.0