सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

14 Mar 2023 14:25:19

sayaji shinde 
 
मुंबई : झाडांची पुन्हा लागवड करताना अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. हल्ला झाल्याक्षणी सयाजी शिंदे आपल्या गाडीत जाऊन बसले व कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे बेंगळुरू महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गाच्या वाटेत येणारी झाडे उन्मळून टाकून देण्यात येत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सयाजी प्रयत्नशील आहेत.
 
मार्गावरील झाडे पुन्हा लावण्याच्या कामात गढलेले असताना अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवायला त्यांनी लगेचच हातातील काम सोडून कर मध्ये जाऊन बसले. त्यानंतर मधमाशांपासून त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. सयाजी शिंदे हे वृक्षप्रेमी आहेत. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड करत असतात.
 
 
Powered By Sangraha 9.0