राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चौघांना तडीपारीच्या नोटिसा

14 Mar 2023 15:50:22
police-notice-to-four-in-mahesh-aher-attack-case-action-of-naupada-assistant-commissioner


ठाणे
: राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांनाही अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. आता पोलिसांनी राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना तडीपारीची कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे आ. जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.


Powered By Sangraha 9.0