ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे मोदींना आश्वासन; कॅनबेराच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध

14 Mar 2023 14:30:20

modi austreliya 
 
 
मुंबई : मार्च महिन्याच्या सुरुवातीस ब्रिस्बेनमधील खलिस्तानी गटाने श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या आणि ऑस्ट्रेलियातील इतर मंदिरांची तोडफोड केल्याचं धक्कादायक कृत्य घडले. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी भेटले. त्यांच्या झालेल्या चर्चेदरम्यान मोदींनी हिंदूंच्या मंदिरांबाबत चिंता वाटत असल्याचे सांगितले व त्याबाबत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पुढे असे होणार नाही व ऑस्ट्रेलियातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत आपण वचनबद्ध असल्याचे संगितले.
 
अल्बानीज यांनी शनिवारी एका पत्रकार बैठकीत सांगितले की, "भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनबेराच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी वचनबद्धतेचे आश्वासन देतो. हा देश अतिरेकी आणि धार्मिक इमारतींवर हल्ल्यांना समर्थन देत नाही. त्यामुळे हिंदूंनी निश्चित असावे."
 
त्यांनी पुढे जाहीर केले की, या हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना कायद्याला आणि शिक्षेला सामोरे जावे यासाठी अधिकारी सर्व उपाययोजना करतील. त्यावर नमोडी म्हणाले, "आम्ही एक सहिष्णु बहुसांस्कृतिक राष्ट्र आहोत आणि ऑस्ट्रेलियात या उपक्रमासाठी जागा नाही,"
 
 
Powered By Sangraha 9.0