मुलीच्या पाठीवरुन फिरवला होता हात! १२ वर्षे चालला खटला, आरोपीची सुटका

लैंगिक हेतूशिवाय,अल्पवयीन मुलाच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवणे लैंगिक छळ नाही : मुंबई उच्च न्यायालय

    14-Mar-2023
Total Views |
nagpur-sexual-harassment-case-non-sexual-intent-hand-touch-on-minor

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका २८ वर्षीय तरुणाची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवणे हे लैंगिक शोषण मानले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

काय आहे प्रकरण ?
 
फिर्यादीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, १५ मार्च २०१२ रोजी आरोपी पीडितेच्या घरी काही कागदपत्रे देण्यासाठी गेला होता. त्यानंतर ती घरी एकटीच होती.तेव्हा आरोपी जेव्हा १८ वर्षांचा होता . त्याचवेळी आरोपीने तिच्या डोक्यावर व पाठीवर हात ठेवून तू मोठी झाली आहे, असे सांगितले. या वागण्याने मुलगी अस्वस्थ झाली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने १०फेब्रुवारी रोजी आदेश दिला होता. जो १३ मार्च रोजी सार्वजनिकरित्या जाहिर करण्यात आला.

या प्रकरणी ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या आदेशाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या संदर्भात, उच्च न्यायालयाने म्हणाले की, ट्रायल कोर्टाने निकाल देताना चूक केली, हे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसून येते की ही कारवाई कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय केली गेली आहे. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पीडितेचे वय त्यावेळी १२-१३ वर्षे असावे, त्यानंतर तिने आरोपीच्या वाईट हेतूबद्दलही बोलले नाही. तिने निवेदनात म्हटले आहे की तिला काहीतरी वाईट वाटले किंवा काही अप्रिय कृत्य झाल्याची भावना होती, ज्यामुळे ती अस्वस्थ होती. या प्रकरणी फिर्यादी पक्षाला असा कोणताही पुरावा सादर करता आला नाही.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.