राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत

    14-Mar-2023
Total Views |
karnataka-assembly-election-assam-cm-himanta-biswa-sarma-says-rahul-gandhi-never-be-able-to-become-pm



बंगळूरू
:’जोपर्यंत नरेंद्र मोदीजी आहेत, तोपर्यंत राहुल गांधी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. कर्नाटकातील कनकगिरी आणि कोप्पळ या शहरांमध्ये विजय संकल्प यात्रेदरम्यान त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हिमंता बिस्वा म्हणाले, आम्हाला कर्नाटकात भाजपला सत्तेत आणायचे आहे. आम्हाला आता बाबरी मस्जिद नकोय, रामजन्मभूमी हवी आहे.’, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात हिमंता बिस्वा पुढे म्हणाले, लंडनमध्ये भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला, यासाठी त्यांनी देशवासियांची माफी मागितली पाहिजे, असे सांगून ते पुढे म्हणाले, “ही विधानसभा निवडणूक आमच्यासाठी सेमीफायनल आहे. अंतिम फेरीत लढून नरेंद्र मोदींची तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी निवड करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत ‘अमृत काल’मध्ये विश्वगुरू बनेल.’ असेही ते म्हणाले.