"शितल म्हात्रे प्रकरणात खरा आरोपी..."; वरुण सरदेसाईंची प्रतिक्रीया

14 Mar 2023 17:51:55
 
Varun Sardesai
 
मुंबई : "शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आहे, त्यांनीच तो संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला होता. त्यामुळे या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे," असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते असे वरुण सरदेसाई यांनी येथे केला.
 
व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे ? असा सवालही त्यांनी केला. सरदेसाई हे मंगळवारी पक्षाच्या बैठकीसाठी नागपुरात आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते खऱ्या आरोपीला अटक करतील. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर रोज आरोप केले जात आहे. सध्या केंद्र तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहे. असे सरदेसाई म्हणाले.
 
दरम्यान, या प्रकरणावर शितल म्हात्रे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "यासंबंधी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. दोन अज्ञात व्यक्ती पाठलाग करत असल्याचे त्यांनी सांगितले."
 
 
Powered By Sangraha 9.0