जम्मू – काश्मीरमध्ये एनआयएची छापेमारी

    14-Mar-2023
Total Views |
 
NIA
 
 
नवी दिल्ली :राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी दहशतवाद संबंधित एका प्रकरणात काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी एनआयएने जम्मू – काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या मदतीने श्रीनगर, पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली आहे.
 
प्राप्त माहितीनुसार, विविध प्रतिबंधित संघटना आणि त्यांचे सहयोगी विविध नावाखाली दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया घडवून आणण्याचा आणि गुन्हेगारी कट रचण्याचा प्रयत्न करत होते. त्याविषयी एनआयएने छापेमारी केली. श्रीनगरमध्ये अब्दुल रशीद तेली याचा मुलगा जुनैद अहमद तेली याच्या घरावर छापा टाकला. त्याचप्रमाणे निलोरा येथे मोहम्मद अल्ताफ भट यांचा मुलगा झीशान अल्ताफ आणि पुलवामा येथील लिटरमध्ये गुलाम हुसेन मलिक यांचा मुलगा आरिफ मलिक यांच्या घरांचीही झडती घेतली आहे. जम्मू – काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक आणि सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ला करण्यात या प्रतिबंधित संघटनांचा हात होता.
 
पीएफआयविरोधात दोषारोपपत्र दाखल
 
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कारवाया आणि राजस्थानमधील हिंसक अतिरेकी अजेंडा या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएने दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. कोटा येथील मोहम्मद आसिफ उर्फ आसिफ आणि बारन, राजस्थान येथील सादिक सराफ या दोघांवर भादंवि कलम १२० ब, १५३ अ आणि युएपीए कलम १३, १७, १८, १८ अ आणि १८ ब अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.