जगदीश कपूर यांची इन्व्हेंट अॅसेट्स सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    14-Mar-2023
Total Views |
 
मुंबई :  प्रसिद्ध बँकर श्री जगदीश कपूर यांची मुंबईस्थित अॅसेट सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन क्षेत्रातील कंपनी, इन्व्हेंट अॅसेट सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडने अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत कपूर यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


जगदीश कपूर यांनी रिझव्‍र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. वित्त क्षेत्रातील त्यांची उत्कृष्ट कारकीर्द असून  ते एचडीएफसी बँक आणि मुंबई शेअर बाजाराचे  अध्यक्षपद देखील त्यांनी भुषविलेले आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, नॅशनल हाऊसिंग बँक, नाबार्ड आणि एक्झिम बँक यांसारख्या अनेक आघाडीच्या बँकांच्या संचालकपदावर काम केलेले आहे.

कपूर यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना, इन्व्हेंट अॅसेट्स सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष पंकज गुप्ता म्हणाले, “इनव्हेंट अॅसेट्स सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शनच्या संचालक मंडळावर जगदीश कपूर यांच्यासारखे ख्यातनाम आणि प्रतिष्ठित व्यावसायिक अध्यक्ष म्हणून लाभणे, हे आमचे भाग्य आहे. या क्षेत्रातील आणि एकूणच उद्योगातील त्यांचा अफाट अनुभव आगामी कालावधीत आमच्या विकास योजनांसाठी खूपच मोलाचा ठरणार आहे.”

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.