अनिल परब यांना अटक करु नका; कोर्टाचे निर्देश

14 Mar 2023 14:28:34
 
Anil Parab
 
मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहेत. दोनदिवसांपूर्वी दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर परब यांनी कोर्टात धाव घेतली होती. काही तासांपूर्वीच, जयराम देशपांडे अटक करण्यात आली आहे.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या.
 
 
Powered By Sangraha 9.0