‘लव्ह जिहाद’विरोधात भगवे वादळ

मीरा-भाईंदरच्या जनआक्रोश मोर्चात हजारो सहभागी

    14-Mar-2023
Total Views |
Against Love Jihad Jan Akrosh


भाईंदर (खानिवडे)
: हिंदू धर्माच्या मुळावर येणार्‍या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने दि. १२ मार्च रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकर्‍यांच्या हातात भगवे झेंडे आणि फेटे परिधान केलेल्या जनसमुदायामुळे येथील रस्त्यावर भगवे वादळ जाणवत होते.

गोल्डन नेस्ट सर्कल वरून निघालेला हा मोर्चा एस. के. स्टोन येथपर्यंत निघाला होता. या मोर्चात भाजपचे आमदार नितेश राणे, माजी आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष रवी व्यास, त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंदुवादी नेता अशी ओळख असलेले काजल हिंदुस्थानी हेसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते.
 
दरम्यान, या भव्य दिव्य मोर्चानंतर झालेल्या सभेत प्रमुख वक्त्यांनी लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद तसेच धर्मांतर विरोधात कायदा लागू करण्याची मागणी करत घणाघाती भाषण केले. यावेळी काजल हिंदुस्थानी यांनी सिनेनगरी मुलींना बिघडवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. शासनाने जन भावनांचा आदर राखायला हवा, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरण यावर खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचे गीता जैन यांनी या वेळी सांगितले.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.