शेफाली वैद्य यांना शारदा सन्मान पुरस्कार

    13-Mar-2023
Total Views |
 
shefali
 
मुंबई : लेखिका शेफाली वैद्य यांना त्यांच्या कला संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शारदा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील जीएसबी सभा या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रमाणित करण्यात आला. सदर कार्यक्रम दादर येथील बी एन वैद्य सभागृहात पार पडला.
 
यावेळी रघुनंदन कामात व अर्चना बेलतंगडी यांनाही पुरस्कार प्राप्त झाले. जुहू स्कीम मधल्या एका छोट्या दुकानापासून सुरुवात करून रघुनंदन यांनी आज देशभरात १४० आऊटलेट्स काढली. यातून ते नॅचरल्स आईस्क्रीम वितरित करतात. त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर अर्चना बेलतंगडी यांनी संध्याफ्रेश ह्या ब्रॅण्डखाली मसाला, पीठ वगैरे गोष्टींचा व्यवसाय उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात सुरु करून, तिथल्या महिलांना रोजगार देऊन वार्षिक दहा कोटीची उलाढाल केली. त्यांना महिला उद्यमी पुरस्काराने प्रमाणित करण्यात आले. हे सर्व पुरस्कार येस बँकेच्या माजी सीओओ अनिता पै हयांच्या हस्ते प्रदान केले गेले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.