‘नाटू नाटू’ला ‘ऑस्कर’ मोदी म्हणतात...

    13-Mar-2023
Total Views |
Natoo Natoo
नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगीत दिग्दर्शक एम. एम. कीरवानी, गीतकार चंद्रबोस आणि ‘नाटू नाटू’ या ‘गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट स्वतंत्र गीत’ या विभागातील ऑस्कर पुरस्कार मिळवल्याबद्दल ‘आर आर आर’ चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. ‘आर आर आर’ चित्रपटातील ‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून त्याचे हे यश उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

मोदी ट्विटमध्ये म्हणाले की,‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून हे गाणे आगामी अनेक वर्ष संस्मरणीय ठरेल. संपूर्ण चमूचे या प्रतिष्ठित सन्मानासाठी अभिनंदन. संपूर्ण भारत यासाठी आनंदित आहे आणि भारताला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृह आणि आणि सहकार मंत्री अमित शाह यांनीदेखील प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल ‘आर आर आर’ चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याचे आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटाचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये गृहमंत्री म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकून या गाण्याने इतिहास रचला आहे.”

दुसर्‍या ट्विटमध्ये अमित शाह म्हणाले, 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटासाठी ऑस्कर जिंकल्याबद्दलही चमुचे अभिनंदन हा चित्रपट हत्तींना वाचवण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपट उद्योगाची क्षमता अधोरेखित करत तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.