कंगना जेव्हा दीपिकाचे कौतुक करते..

    13-Mar-2023
Total Views |

 
dipioka
मुंबई : ऑस्कर समारंभात काही भारतीय कलाकार उपस्थित होते त्यापैकी अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा उपस्थित होती. दीपिकाचा फोटो पाहून अभिनेत्री कंगना रणौत हिने ट्विट केले आहे. कंगनाने दीपिकाचे कौतुक केल्याने अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी टीकेची झोड उठवली आहे तर काहींनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
कंगना आपल्या पोस्ट मध्ये लिहिते, "पहा तर दीपिका किती सुंदर दिसत आहे, इतका सुंदर वेष परिधान करून ती भारतचे प्रतिनिधित्व करत आहे. भारताची प्रतिमा आणि सामर्थ्य सांभाळत आपल्या नाजूक खांद्यांवर तिने पेलून धरले आहे. स्त्रिया किती कणखर असतात हे दाखवून देण्यासाठी ती उंच उभीं आहे."
 
तिच्या या पोस्ट वर अनेकांनी टिप्पणी केली आहे. एका वापरकर्त्याने म्हंटले आहे की, तू केव्हापासून तुकडे गॅंग च्या अभिनेत्रींचे कौतुक करू लागलीस तर काही म्हणाले तुला दीपिकाच्या नजरेत यावयाचे आहे का? काहींचे असे म्हणणे होते की कंगनाकडे चित्रपट नसल्याने ती हे काम करते आहे. एका वापरकर्त्याने मात्र कंगनाची याबाबतीत कौतुक केल्याचेही दिसते आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.