ठाण्यात पाणीपुरवठा बंद!

    13-Mar-2023
Total Views |
 


 ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील २००० मि.मीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच ३ च्या बाजूस बुधवारी १५ मार्च रोजी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सकाळी ९ ते गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
  या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेल टाकी, सिध्देश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी इ. गृहसंकुले तसेच, कळव्याच्या व मुंब्र्याच्या काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.