मीरा-भाईंदर : शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. जलवाहिनी दुरुस्तीचे तसेच इतर महत्त्वाचे काम हाती घेतल्याने स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार, दि. १५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते गुरुवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तासांकरिता) बंद राहणार आहे.
त्यामुळे, स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मीरा-भाईंदर शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व मीरा-भाईंदर महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.