‘त्या’ तरुणीला रंगवणारे जेरबंद

    12-Mar-2023
Total Views |
japanese-girl-harassment-case-update-holi-video-viral

नवी दिल्ली : होळीच्या दिवशी एका तरुणीचा छळ सुरू असलेला व्हिडिओ गेल्या तीन दिवसांपासून ‘व्हायरल’ होत होता. सदर व्हिडिओ दिल्लीतील असून त्यातील तरुणी जपानी पर्यटक असल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार अधिक चौकशी केल्यावर पोलिसांनी त्या तरुणीला छळणार्‍या मुलांना अटक केली आहे.

सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण होळीच्या दिवशी रंग खेळताना दिसत आहेत. यातील तीन ते चार तरुणांनी जपानी मुलीच्या अंगाला जबरदस्तीने रंग लावताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.