दीडशे कोटींचा बंगला अवघ्या ४ लाखात

12 Mar 2023 17:37:28
cm-tejashwi-yadav-ed-raid-news-update


नवी दिल्ली
: आरजेडीचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्या कुटुंबावर टाकलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोट्यवधींची मालमत्ता उघड झाली आहे. यात नवी दिल्लीतील उच्चभू्र भागात तब्बल दिडशे कोटी रुपये किंमतीचा बंगला तेजस्वी यादव यांनी अवघ्या ४ लाख रुपयांत विकत घेतल्याचे उघड झाले आहे.
 
इडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रोकड आणि ६०० कोटी रुपयांची इतर मालमत्ता उघडकीस आणली आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात, ईडीने यादव कुटुंबियांचे अनेक कारनामे उघड केले आहेत.
 
दिल्लीतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या न्यू फ्रेंड कॉलनीमध्ये असलेला चार मजली बंगला अवघ्या ४ लाख रुपयांना विकत घेतल्याचे या छाप्यात दिसून आले आहे. या बंगल्यावर छापा टाकला तेव्हा बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपस्थित होते.
 
इतकेच नाही तर अंमलबजावणी संचालनालयाने लालू यादव यांची मुलगी आणि तेजस्वी यादव यांची बहीण रागिणी यादव यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त केली. छाप्यात ईडीला केवळ रोख रक्कम आणि दागिनेच नसून गोपनीय कागदपत्रे मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे.

 
Powered By Sangraha 9.0