राहुल गांधींची खासदारकी धोक्यात!

    12-Mar-2023
Total Views |
bjp-nishikant-dubey-claims-rahul-gandhi-will-lose-lok-sabha-seat-for-pm-modi-attack

नवी दिल्ली : ‘हिंडेनबर्ग’ अहवालाद्वारे कोणत्याही पुराव्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची बदनामी करणे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भोवणार असल्याचे दिसते. या प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदीय समितीसमोर राहुल गांधी यांनी विशेषाधिकार सूचनेचा भंग केल्याप्रकरणी समितीसमोर आपले म्हणणे मांडले. त्यानुसार कारवाई झाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात राहुल गांधींच्या भाषणानंतर दुबे यांनी गांधींविरोधात विशेषाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी नोटीस दिली होती. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान ‘हिंडेनबर्ग’-‘अदानी’ प्रकरणावर भाष्य केले होते. ‘हिंडेनबर्ग’ अहवालाद्वारे कोणत्याही पुराव्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची बदनामी करणे म्हणजे देशाच्या प्रतिमेला धक्का असल्याचे दुबे यांनी समितीसमोर सांगितले. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात राहुल गांधींनी ७५ वेळा अदानी यांचे नाव घेतल्याचे देखील दुबे म्हणाले.
 
दरम्यान, ‘हिंडेनबर्ग’-‘अदानी’ प्रकरणात विशेषाधिकार समिती पुढील आठवड्यात राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावण्याची आहे. भाजप खासदार सुनील सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती काय निर्णय घेते यावरच राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व राहणार की जाणार हे स्पष्ट होणार आहे.
 
दरम्यान, लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली भूमिका मांडताना दुबे म्हणाले, “लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचे विधान सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकल्यानंतरही ते त्यांच्या आणि काँग्रेसच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.
गांधींनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हणत दुबे यांनी समितिसमोर काही पुरावेदेखील सादर केले. उद्योगपती गौतम अदानी यांचे विविध व्यवहार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात झाले होते,” असे दुबे यांचे म्हणणे आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.