'झोमॅटो’कडूनही हिंदूंच्या भावनांशी खेळ?

11 Mar 2023 16:29:36
boycott-zomato-trends-as-ujjain-priests-demand-apology-over-hrithik-roshan

नवी दिल्ली
:  ‘झोमॅटो’ या फूड डिलिव्हरी कंपनीच्या एका जाहिरातीत बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्याला पाहण्यास मिळतो. पण या जाहिरातीवर पुजार्‍यांकडून आक्षेप घेण्यात आला. कारण, हृतिक रोशनच्या या ‘झोमॅटो’ जाहिरातीमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावरून संपूर्ण वादाला तोंड फुटले. ‘थाली का मन किया, उज्जैन में, फिर महाकाल से मंगवा लिया’ हे वाक्य हृतिक रोशन बोलताना या जाहिरातीत दिसतो. मात्र, या जाहिरातीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप महाकाल मंदिराच्या पुजार्‍यांकडून करण्यात आला. दरम्यान, ‘झोमॅटो’कडून यासंदर्भात त्वरित माफी मागण्यात आली.



Powered By Sangraha 9.0