अभिनेता आमिर खान पोलीस आयुक्तालयात आल्याने चर्चेला उधाण!

- पिंपरी चिंचवड शहरात चर्चेला उधाण

    11-Mar-2023
Total Views |
actor-amir-khan-came-to-pimpri-chinchwad-police-commissionerate
 
पुणे : पिंपरी  येथील आयुक्तालयात अभिनेते आमिर खान आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आमिर खान पोलिस आयुक्तालयात आल्याने चर्चेल उधाण आले होते. मात्र, त्यांची ही पूर्वनियोजित भेट असल्याचं पुढं आलं असून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ते भेटून पुढे मार्गस्थ झाले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आमिर खान याच्यासोबत फोटो घेतला.

हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणून आमिर खान च नाव आवर्जून घेतलं जातं. आज तोच अभिनेता अमीर खान अचानक पिंपरी- चिंचवड च्या पोलिस आयुक्तालयात दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. आमिर खान का? आणि कशासाठी आले असावेत असे अनेक प्रश्न पडले. आमिर खान आणि पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची मैत्री असून ते त्यांना भेटण्यासाठी थेट पोलिस आयुक्तालयात पोहचले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.