दहावीच्या विद्यार्थ्यांनो! अधिकृत वेळापत्रकच पहा! अन्यथा पेपरला मुकाल!

10 Mar 2023 17:21:32
ssc-exam-viral-time-table-many-10th-students-lost-paper-due-to-wrong-exam-schedule

मुंबई : सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकात चुकीची तारीख असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपरच बुडाला आहे. दरम्यान, व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवण ही विद्यार्थ्यांची चूक आहे. असं म्हणत व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे.या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
 
एसएससी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार दहावीचा हिंदी या विषयाचा पेपर ८ मार्चला दाखवण्यात आला होता. पंरतू सोशल मीडियावर व्हायरल वेळापत्रकात तोच पेपर ९ मार्चला दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. पंरतू हॉल तिकीटवरील वेळापत्रकानुसार हिंदी ह्या विषयाचा पेपर ८ मार्च होणार होता. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवला. आतापर्यतच्या माहितीवरून ५० विद्यार्थ्यांचा पेपर बुडाला असल्याचा अदांज बोर्डाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

या संपुर्ण प्रकरणावर बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवण ही विद्यार्थ्यांची चूक असल्याचे म्हटले आहे. त्यांना सांगितल होत व्हायरल होणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. पण त्यांनी ठेवला.तसेच किती विद्यार्थ्यांचा पेपर चुकला आहे, त्याची लेखी आकडेवारी आलेली नाही. मात्र, एकूण ५० विद्यार्थ्यांनी पेपर दिले नसल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.आता हा चुकलेला पेपर देण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या जुलैच्या परिक्षेमध्ये पेपर द्यावा. नाहीतर दहावीला एटीकेटीचा पर्याय दिला आहे. दोन विषयात जरी विद्यार्थी पास झाला नाही तरीही त्याला अकरावी प्रवेश मिळतो. आणि ज्यांचा पेपर चुकला आहे त्यांनी जुलै महिन्यात पेपर द्यावा. या दोन पर्यायामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही वर्ष वाया जाणार नाही, अशी माहिती ही शरद गोसावी यांनी दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0