वर्धा ते सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्गात कोणती धार्मिक स्थळे जोडणार?

10 Mar 2023 17:43:32

shaktipithe 
 
मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी वर्धा येथील पवनार पासून सिंधुदुर्गातील पात्रादेवी पर्यंत हा मार्ग असेल असे घोषित केले. नागपूर पासून मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग सुरु झाला त्यानंतर शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली. यासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षितासल्याचे फडणवीसांनी सांगितले. यात शक्तिपीठे, जोतिर्लिंगे व काही इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
 
माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही तीन शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग तसेच नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या मंदिरांच्या जोडले जाणणे अनेक फायदे त्या त्या शहरातील व गावांतील जनतेला होणार आहेत तसेच काही तोटे सुद्धा आहेत.
सामाजिक तसेच अनेक आर्थिक फायदेही यानिमित्ताने होणार आहेत. मंदिराच्या परिसरातील दुकाने, हॉटेले, तेजीत चालू होतील.
 
लहान व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. अनेक होमस्टे मोठी घरे असणाऱ्या लोकांना सुरू करता येतील. यातून बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. गावे समृद्ध होतील. मुख्य प्रवाहात येतील. शहरांना जोडली जातील. गावागावातील लोकसंस्कृती पर्यटकांना आणि भाविकांना ज्ञात होऊन तिचा प्रसार व संवर्धन होईल. महाराष्ट्राची बौगोलिक संरचना मोठ्या प्रमाणात बदलेल. जमीनदारांच्या ज्या जमिनी मॅंर्गासाठी वापरल्या जणार आहेत त्या शेतकऱ्यांना पैसे मळणार असलं तरीही सुपीक जमीन निष्फळ होणार असल्याचा तोटा महाराष्ट्राला सहंकाराव लागणार आहेच.
 
 
Powered By Sangraha 9.0