मुंबई विमानतळावर ५३ कोटींचे ‘हेरॉईन’ जप्त

    10-Mar-2023
Total Views |
mumbai-man-held-at-airport-with-heroin-worth-rs-53-crore


मुंबई
: आदिस अबाबा येथून मुंबईला येणार्‍या एका प्रवाशाकडून अमली पदार्थांची भारतात तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाच्या अधिकार्‍यांच्या पथकाने पाळत ठेवत एका प्रवाशाला अटक केली आहे.या प्रवाशास मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून दि. १० मार्चपर्यंत ‘डीआरआय’ कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

‘डीआरआय’ अधिकार्‍यांच्या पथकाने मंगळवारी एका संशयित प्रवाशालाअडवत त्याच्या सामानाची झडती घेतली असता संशयिताने ट्रॉली बॅगच्या आत पोकळी बनवून लपवून ठेवलेली ७.६ किलो ‘ऑफ-व्हाईट पावडर’ जप्त करण्यात आली आहे. या भुकटीची चाचणी केल्यानंतर त्यात ‘हेरॉईन’ असल्याचे आढळले असून या हेरॉईनची किंमत सुमारे ५३ कोटी असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.