जौहर गनीने केली डॉ. सुमेधा शर्मांची हत्या

10 Mar 2023 19:16:26
jammu-jauhar-mehmood-killed-dr-sumedha-with-a-meat-cutting-knife-in-jammu

नवी दिल्ली : होळीच्या दिवशी जम्मू येथे लव्ह जिहादसदृश घटनेमध्ये डॉ. सुमेधा शर्मा यांची हत्या त्यांचा प्रियकर जौहर गनी याने केल्याची धक्कादायग घटना घटली आहे. या हत्येसाठी जौहर गनी याने जनावरांचे मांस कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार सुऱ्याचा वापर केल्याचेही समजते.


देशभरात विविध ठिकाणी लव्ह जिहाद आणि त्यातून हिंदू तरूणींच्या हत्येचा एक पॅटर्न दिसून आला आहे. काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांडातही हाच पॅटर्न दिसून आला होता. आता अशाचप्रकारे जम्मूमध्येदेखील डॉ. सुमेधा शर्मा यांची त्यांच्या मुस्लिम प्रियकराने हत्या केली असून प्रियकरानेही नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.


जम्मू येथील रहिवासी डॉ. सुमेधा शर्मा आणि जम्मूमधील डोडा जिल्ह्यातील रहिवासी जौहर गनी यांनी जम्मूमधील एका दंतवैद्यकीय महाविद्यालयातून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचा (बिडीएस) अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर सुमेधा शर्मा यांनी एमडीएस करण्यासाठी जम्मू – काश्मीरबाहेरील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने होळीच्या दिवशी डॉ. सुमेधा या जौहर गनी यास भेटण्यासाठीसाठी त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर दोघांमध्ये काही मुद्द्यांवरून भांडण झाले आणि जौहर गनमी याने धारदार सुऱ्याने डॉ. सुमेधा यांची हत्या केली. विशेष म्हणजे जौहर गनी याने हत्या केल्यानंतर त्याच सुऱ्याने आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याविषयी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हाचा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Powered By Sangraha 9.0