महत्त्वाची बातमी! H3N2 विषाणूचा पहिला बळी कर्नाटकात!

आतापर्यत ९० सक्रंमित आणि २ जणांचा मृत्यू

    10-Mar-2023
Total Views |
influenza-threat-influenza-h3n2-virus-is-increasing-in-the-india

नवी दिल्ली : भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस H3N2 या विषानूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात प्रत्येकी एक अशा संख्याने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील ८२ वर्षीय हासन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती आहे. त्याचबरोबर हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , हासन यांना २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र १ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. तसेच या हासन यांना डायबेटिस आणि हाय ब्लड प्रेशरचा आजार होता. तसेच देशभरात आतापर्यत H3N2 या विषाणूचे ९० रूग्ण आढळले आहेत. या दोन्ही विषाणूची लक्षणे कोरोना व्हायरससारखी आहेत. गेल्या महिन्याभरापासून देशात तापाच्या साथीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये बहुतांश रुग्ण H3N2 या विषाणूने संक्रमित असल्याचं समोर आलंय. या विषाणूला 'हाँगकाँग फ्लू' या नावानेही ओळखलं जाते. हा विषाणू भारतामध्ये इतर इन्फ्लुएंझा सब व्हेरियंटच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आहे.

ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.