‘बार्टी’च्या महासंचालकपदी सुनील वारे रुजू

10 Mar 2023 15:29:13
Sunil Vare as Director General of 'Barti'


मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे’ संस्थेच्या महासंचालकपदी सुनील वारे यांची दि. ८ मार्च रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दि. ९ मार्च रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

’बार्टी’ महासंचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वारे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील ज्ञानाचे एकमेव प्रतीक असून त्यांच्या नावाने असलेल्या संस्थेत मला काम करण्याची संधी मिळाली यांचा मला अभिमान असून ‘बार्टी’ संस्थेचा नावलौकिक उंचावण्यासाठी आपण काम करू,” असे मनोगत व्यक्त करुन त्यांनी ‘बार्टी’ संस्थेतील विविध विभागांची पाहणी करून अधिकारी व कर्मचार्‍यांशी चर्चा केली तसेच कामकाजाची माहिती घेतली.यावेळी इंदिरा अस्वार निबंधक-बार्टी, विभागप्रमुख स्नेहल भोसले, डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, वृषाली शिंदे, रवींद्र कदम, अनिल कांरडे लेखाधिकारी राजेंद्र बरकडे आदी उपस्थित होते.

गेल्याच महिन्यात सुनिल वारे यांची प्रतिनियुक्तीने बार्टी महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. परंतु त्या नियुक्तीविरोधात तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी मॅट (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) मध्ये याचिका दाखल केली. त्यामुळे सुनिल वारे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. महिनाभरातच गजभिये यांनी आपली याचिका मागे घेतल्यामुळे ते महासंचालक पदावरून कार्यमुक्त झाले. त्यानंतर गुणवत्ता आणि नियमानुसार सुनील वारे यांनी बार्टीचे महासंचालक म्हणून पदभार स्विकारला आहे.

Powered By Sangraha 9.0