गणेश नाईक यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

    10-Mar-2023
Total Views |
 

नवी मुंबई : लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आणि युवानेते संकल्प नाईक यांनी आज महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


डॉक्टर संजीव नाईक हे 2009 साली खासदार म्हणून कार्यरत असताना राज्यपाल रमेश बैस हे देखील तत्कालीन खासदार म्हणून लोकसभेमध्ये रायपूरचे प्रतिनिधित्व करीत होते. काही संसदीय समित्यांवर या दोघांनी एकत्र कामही केले आहे. या आठवणींना या सदिच्छा भेटीमध्ये उजाळा मिळाला. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाविषयी राज्यपाल बैस यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला. राज्यपाल रमेश बैस यांच्या रूपाने महाराष्ट्राला लोकप्रतिनिधित्व आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राज्यपाल लाभलेले आहेत. आपले संविधानिक कर्तव्य ते समर्थपणे पार पाडतील, अशी प्रतिक्रिया डॉक्टर संजीव नाईक यांनी याप्रसंगी दिली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.