राष्ट्रवादीतील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई! पुण्यात छापे

10 Mar 2023 13:13:49

ED





कोल्हापूर
( hasan mushrif ed raid ) : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरू केली आहे. मुश्रीफांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली असून झडती सुरू आहे. या प्रकरणाचे वृत्त एएनआयने दिले आहे. मुश्रीफांच्या कागलच्या घरावर ईडीने जानेवारीत छापे टाकले होते. त्यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्याही बंगल्यावर ही धाड पडली होती. तसेच मुश्रीफांवर गडहिंग्लज साखर कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याचेही आरोप आहेत.

यापूर्वी मुश्रीफांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीवेळी सभासद व भागधारकांकडून प्रत्येकी दहा हजारप्रमाणे शेअर भांडवल घेतले. त्यातील ४० कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विनायक कुलकर्णी व अन्य १६ जण या प्रकरणात तक्रारदार आहेत. या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. मुश्रीफांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा खोटा गुन्हा दाखल झाल्याचेही मुश्रीफांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुश्रीफांच्या अडचणी वाढल्या!


सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला तसेच ब्रिस्क फॅसिलिटीज् (शूगर डिव्हीजन) कंपनीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाचा तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा बँकेचा संबंध आहे का? या तीन बाबींचे चाचणी लेखापरिक्षणे आदेश सरकार विभागाला दिले आहेत. माजी खासदार किरीट सोमय्यांनी ईडीकडे दिलेल्या तक्रारीनंतर ईडी अॅक्शनमध्ये आली आहे. जिल्हा बँकेला आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार आहेत.


Powered By Sangraha 9.0