मोठी बातमी! १४ मार्चला महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप

भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले सूचक विधान

    10-Mar-2023
Total Views | 291
breaking news

मुंबई
: महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा भाजप प्रवेश येत्या १४ तारखेला होणार आहे. तसा गौप्यस्फोट खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. येत्या १४ तारखेला पक्षप्रवेशाचा मोठा भूकंप राज्याला बसणार असल्याचे बावनकुळेंनी सांगितल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आता तो बडा नेता कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा दावाही नेत्यांकडून करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा असाच दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. १४ तारखेला मोठा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे मोठा भूकंप राज्याला बसेल, असेही ते म्हणाले.
 
"आम्ही बोलाची कढी करत नाही," असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. १४ तारखेला राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र त्यांनी हा दावा करताना कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121