ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत आगमन

    10-Mar-2023
Total Views |
Australian Prime Minister Anthony Albanese arrives in Mumbai

मुंबई : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुंबईचे उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव व महानगर आयुक्त मुंबई महानगर विकास प्राधिकरण श्री.एस. व्ही. आर. श्रीनिवास, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदींनी स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.