माझी बदनामी केली जात आहे : अनिल परब

    10-Mar-2023
Total Views |
Anil Parab


मुंबई : दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले. यानंतर परब यांनी प्रतिक्रीया देत माजी खासदार किरीट सोमय्यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषद उपसभापती यांच्याकडे ही मागणी केली आहे.

किरीट सोमय्या माझी बदनामी करण्याचे काम करत आहेत. कागद पत्रे तपासल्यानंतर कारवाई करणे गरजेचे होते. मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या मुंबईत 56 वसाहत आहेत. काही इमारतीच्या खाली जागा नाही. पण आमच्या इमरतीमध्ये जागा आहेय ही जागा लोवर इनकम गटाची होती. पण माझ्या विरोधात म्हाडाच्या भूखंड हडपला असा आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केला. मला इमारतीच्या लोकणांनी ती जागा वापरण्याची जागा दिली होती. भूखंड गिळले असे माझ्यावर आरोप करण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर कोणतीही तपासणी न करता माझ्यावर कारवाई केली त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणीही परब यांनी केली आहे.