संजय राऊतांच्या निकटवर्तियांच्या आवळल्या मुसक्या

01 Mar 2023 17:27:23
mumbai-police-eow-arrested-two-accused-in-covid-centre-scam-allegations-by-bjp-leader-kirit-somaiya

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर उभारणीत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा निष्पन्न झाले असून याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तिय असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने बुधवारी (दि. १) अटक केली आहे. या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला आहे.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे सहकारी आणि पार्टनर असलेल्या सुजित पाटकर आणि त्यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने कोविड सेंटरच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास सुरू आहे. राजीव साळुंके आणि सुनील कदम यांना यात पोलिसांनी अटक केले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ६ मार्च २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनील धामणे यांचीच चौकशी करा

 
कोरोना काळात मुंबई महापालिकेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल समोर आला होता. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात फोर्जरी झाली आहे, असे म्हटले होते. पण अहवालाच्या शेवटी कारवाई करायची गरज नाही, असा शेरा धामणे यांनी मारला होता. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.


कंपनीची नोटरी फोर्जरी

याप्रकरणी किरीट सोमय्या म्हणाले, पालिकेने दोन सदस्यांची समिती नेमली. सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २०२२ ला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. समितीच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वात केव्हा आली यावर महापालिकेने लिगल ओपिनियन मागितले. त्यावर विधी विभाग म्हणाले, या कंपनीची नोटरी फोर्जरी आहे. महाराष्ट्रात पार्टनरशीप डीड करणे कायद्याने बंधनकारक आहे.

Powered By Sangraha 9.0